Breaking News

अर्जुनी मोर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत यापूर्वी 24 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले होते त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या 16 जून च्या आदेशान्वये व जिल्हाधिकाऱ्यांच्या आठ जुलै च्या सुधारित अधिसूचनेनुसार तहसील कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 15 रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात आरक्षण पदाच्या संख्येत पाच ने वाढ झाली तर सर्व साधारण जागा पाच ने कमी झाल्या त्यामुळे काही ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड झाला.

दिनांक 15 रोज मंगळवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिरुद्ध कांबळे नायब तहसीलदार निवडणूक विनोद कुमार पेंदाम यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सरपंच ग्रामसेवक ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते आरक्षण सोडत ईश्वर चिट्ठीने आराध्या कोचे या बालिकेच्या हस्ते सोडत काढण्यात आली सुधारित अधिसूचनेनुसार नव्याने 71 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली 71 ग्रामपंचायत पैकी अनुसूचित जाती 13 अनुसूचित जमाती साठी सोळा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 19 सर्वसाधारण साठी 23 याप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली.

सर्वसाधारण ग्रामपंचायत खालील प्रमाणे 

एरंडी देवलगाव , बोंडगाव सूरबन, ताडगाव ,केशोरी ,बोरी ,कोरंबीटोला, कोरंबी ,माऊरकुडा, मांडवखाल, मुंगली, बोधरा, बाकटी ,जाणवा, भीव खिडकी ,शिरोली ,इटखेडा, रामनगर ,पिंपळगाव ,दिनकरनगर, अरुण नगर ,गौरनगर, बोडदे करड व गोठणगाव

अनुसूचित जाती आरक्षित ग्रामपंचायत खालील प्रमाणे 

राजोली, तिडका, इसापूर, वडेगाव बंदया, परसोडी रयत, कुंभीटोला, रामपुरी, दाभणा, झासी नगर, देवलगाव एरंडी, इडदा, कन्नड गाव, सायगाव व बुदेवाडा 

अनुसूचित जमाती 

सिलेझरी ,सावरटोला ,अरततोंडी दाभणा ,निमगाव ,बोंडगाव देवी, खांभी ,विरगाव बर्डे ,पवनी धाबे, नवनीतपूर ,परस्तोला ,धाबेटेकडी आदर्श ,शिरेगाव, प्रतापगड, महालगाव ,कवठा ,गुडरी.

नागरिकांच्या मागास प्रभागाकरिता 

भरनोली, कोहोलगाव ,सोमल्पुर, बोरटोला ,नवेगाव बांध ,,चांना वाकटी ,महागाव ,खामखुरा, कानोली ,बाराभाटी ,चापटी, मोरगाव, तुकोमनारायण ,वडेगाव रेल्वे ,झरपडा, येगाव, एरंडीदरे, करांडली ,व सुकळी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत