Breaking News

लांबोरी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रात्यक्षिक दाखवून गावकऱ्यांना मार्गदर्शन

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर,जिवती : 17/07/2025 रोजी पोलीस स्टेशन जिवती ठाणेदार साहेब यांचे पुढाकाराने अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर चे समन्वयक श्री. अनिल दहागावकर व श्री. धनंजय तावाडे यांनी मौजा लांबोरी येथे गावकऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन बाबत प्रात्यक्षिके दाखवून त्यांना मार्गदर्शन केले. सदर वेळी पोलीस स्टेशन जिवती येथील ठाणेदार प्रवीण जाधव . पो. शि जगदीश मुंडे, अतुल कानवटे. जिवती पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बाबत माहिती देऊन लांबोरी गावातील लोकांसोबत संवाद साधले.

कार्यक्रम स्थळी गावातील सर्व तरुण वयस्कर महिला मंडळ यांना मोलाचे मार्गदर्शन जिवती पोलिस स्टेशन ठाणेदार प्रवीण जाधव साहेब यांनी सांगितले. कार्यक्रमास्थळी कोणत्याही प्रकारची जादूटोणा वगैरे असं काहीही नसते याच्याबद्दल संपूर्ण माहिती त्यांनी दिली कार्यक्रमामुळे खास लांबोरी गावातील नागरिक असो किंवा जिवती पोलीस स्टेशन मधील व परिसरातील सर्व नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलन बद्दल एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवून जिवती पोलिस स्टेशन चे ठाणेदार साहेब यांच्या पुढाकारामुळे गावात जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत