नाकाबंदी करून ५३ गोवंशीय जनावरांची सुटका
जिवती तालुक्यातील मोठी कारवाई
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी|चंद्रपूर, जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याला लागून तेलंगणा राज्याची सीमा असल्याने या मार्गाने गोवंशीय जनावरांची तस्करी होत असून, यापूर्वी अनेक घटना उजेडात आले आहेत. दरम्यान, चिखली खुर्द मार्गे जनावरांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर रविवारी मध्यरात्री पोलीस स्टेशन टेकामांडवा हद्दीत सापळा रचण्यात आला.
यावेळी पोलिसांचे पथक गस्त करीत असताना महाराष्ट्र-तेलंगाना राज्य सीमेवरील चिखली खुर्द वन तपासणी नाक्याजवळ १७ पिकअप वाहने थांबवून तपासणी केली. यावेळी कत्तलीसाठी जाणाऱ्या ५३ गोवंशीय जनावरांची सुटका करून २४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात वाहने व गोवंशीय जनावरे असा एकूण १ कोटी ५२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही घटना पोलीस स्टेशन टेकामांडवा हद्दीत झाली आहे. या तस्करीत २४ आरोपी पैकी १ आरोपी तेलंगाना राज्याचा व इतर २३ आरोपी जिवती तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काॅक्रेडवार, बलराम झाडोकर, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, जगन्नाथ मडावी, स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, अजय बागेसर, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गजलवार,जयसिंह, सुरेंद्र महंतो, गणेश मोहर्ले, प्रमोद कोटनाके, नितेश महात्मे, मिलिंद जांभुळे, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, शेखर मातनकर, प्रफुल गारघाटे, प्रदीप मडावी, रवींद्र पंधरे, राहुल बनकर, मिलिंद टेकाम, यांच्या पथकाने केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत