Breaking News

बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेत गळती – डॉक्टर सलमा पठाण यांच्या तातडीने बदलीची ग्रामस्थांकडून मागणी

बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेत गळती – डॉक्टर सलमा पठाण यांच्या तातडीने बदलीची ग्रामस्थांकडून मागणी


महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, बेला : बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. सलमा पठाण यांच्या बेजबाबदार व गैरवर्तनाच्या कार्यशैलीविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, त्यांच्या तातडीने बदलीची मागणी महसूल मंत्री व पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांनुसार, डॉ. पठाण यांच्या कडून समाधानकारक उपचार मिळत नाहीत, उलट रुग्णांशी उर्मट वागणूक दिली जाते, वेळेवर हॉस्पिटलमध्ये अनुपस्थित राहणे, रुग्णांना योग्य निदान व उपचाराऐवजी अनाठायी रेफर करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.

विशेषतः गंभीर रुग्णांना बेला येथे आणल्यानंतर ते मृत स्थितीत असल्याचे निदान केले न जाता, नागपूर एम्स किंवा मेडिकलला रेफर करण्यात येते आणि तेथे रुग्ण मृत घोषित होतो. परिणामी रुग्णाच्या नातेवाईकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते. ग्रामस्थांनी असेही सांगितले की, साप-विडक्यांचे विषबाधा झाल्यासही 'अननोन बाईट' असे लिहून रुग्णांना पाठवले जाते, जे स्पष्टपणे व निष्काळजीपणाचे निदर्शक आहे.

सकाळी OPD ची वेळ असूनही डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात. OPD उशिरा सुरू होते, तर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध, 102, व आमदार निधीतून आलेल्या अ‍ॅम्बुलन्सचा रुग्णसेवेसाठी उपयोग न करता, डॉक्टर त्यांचा  स्वतःसाठी वापर करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 102 अ‍ॅम्बुलन्स सुसज्ज असून, त्याचे चालक टाळाटाळ करतो.

ग्रामस्थांचा आक्रोश:

"बेला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वातावरण दिवसेंदिवस खराब होत आहे. OPD मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. सेवा देताना डॉक्टर सलमा पठाण यांचा नाखुश व चिडचिडेपणा सातत्याने जाणवतो. त्यामुळे रुग्णसेवेला तडा जात आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच, बेला आरोग्य केंद्रात दोन महिला डॉक्टर असल्याने, सलग तीन दिवस सेवा देणे त्यांच्यासाठी अवघड जाते. त्यामुळे शासकीय नियमानुसार डॉक्टरांनी शिफ्टनुसार काम करावे, असेही सुचविण्यात आले आहे.

ग्रामस्थांची ठाम मागणी:

डॉ. सलमा पठाण यांची तात्काळ बदली करून, त्यांच्या जागी सेवाभावी व कर्तव्यनिष्ठ डॉक्टर नेमावेत, ही ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. संबंधित निवेदनाची प्रत मा. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार मा. श्यामकुमार बर्वे, आमदार मा. संजय मेश्राम, माजी आमदार मा. राजू पारवे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांकडून त्वरित कारवाईची अपेक्षा

मा. चंद्रशेखर बावनकुळे हे जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच सजग असतात. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन त्वरित चौकशी व कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पालकमंत्र्यांकडून त्वरित कारवाईची अपेक्षा — अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

मा. चंद्रशेखर बावनकुळे हे जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच सजग असतात. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन त्वरित चौकशी व डॉ. सलमा पठाण यांच्यावर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जर लवकरात लवकर योग्य ती कारवाई झाली नाही, तर बेला व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. रुग्णसेवेचा प्रश्न हा गावकऱ्यांच्या जीवाशी निगडीत असून, तो हलकासा घेण्यात येणार नाही, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत