बोदवड महाविद्यालयाच्या गणित विभागाकडून अँप्रॉक्सिमेट पाय दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, जळगाव, बोदवड : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागातर्फे गणिताविषयी जागृती व्हावी म्हणून अँप्रॉक्सिमेट पाय दिवस नुकताच साजरा करण्यात आला.संस्थेचे चेअरमन श्री. मिठूलालजी अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून आणि महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गणित विभागातर्फे अँप्रॉक्सिमेट पायदिनानिमित्त प्रथम,द्वितीय वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी पाय संकल्पनेचे उपयोग आणि त्यावरील सुविचार संकलन यासारख्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना वर्तुळाशी संबधित असलेल्या 22/7 च्या जवळपास असणाऱ्या पाय या संकल्पनेचे महत्व समजले.उपप्राचार्य डॉ .विनोदकुमार चौधरी , गणित विभागप्रमुख डॉ. रुपेश मोरे, रिहान शेख, शिवम डहाके ,पाटील , प्रतीक्षा पाटील आणि सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत