बेलदार-ओड समाजाच्या वतीने कूलदैवत कान्हूसती माता यात्रा महोत्सवाचे आयोजन
समस्त बेलदार ओड समाज आयोजित भव्य यात्रा महोत्सव 2025 ‘सारखानी’ ता.किनवट जि. नांदेड येथे
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : आदिवासी बहुल किनवट व माहूर या दोन्ही तालुक्याच्या मध्यस्थानी तथा मराठवाडा व विदर्भ या विभागासह तेलंगणा या राज्याला जोडणारा एक महत्वाचा जंक्शन पॉईंट म्हणून ओळकल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील सारखानी येथील असंख्य भाविकांची कुलदैवत असलेल्या आदिशक्ती कान्हूसती माता देवस्थान येथे अखिल भारतीय बेलदार ओड समाज किनवट माहूर तालुक्याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही दि. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सारखानी येथील माता कान्हूसती देवीचे मंदिर हे बेलदार ओड समाजाची कुलदैवत असून, एक जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर ओळखले जाते. राज्याच्या नांदेड, हिंगोली,लातूर,परभणी संभाजीनगर,पुणे या मराठावाड्यातील अनेक जिल्ह्यासह विदर्भातील यवतमाळ, अमरावती,भंडारा,गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली, या जिल्ह्यातूनच न्हवे तर छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, या शेजारच्या राज्यातून देखील कान्हूसती मातेचे दर्शन घेण्यासाठी केवळ बेलदार ओड समाजातीलच न्हवे तर, हिंदू धर्मातील शेकडो भाविकांची या ठिकाणी वर्दळ सुरु असते.
दरवर्षी कान्हूसती माता देवस्थान येथे कार्तिक महिन्यात बेलदार ओड समाजाच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येथे या वर्षी हि यात्रा कार्तिक शुक्ल शततारखा शनिवार दि.1 नोव्हेंबर ते कार्तिक शुक्ल द्वादशी सोमवार दि. 3 नोव्हेंबर अर्थात विठ्ठल नवरात्रारंभ प्रभोदनी एकादशी ते तुलसी विवाहारंभ चातुर्माष्य समाप्ती या पवित्र कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
या निमित्ताने देवी परिसरात नव्याने झालेले सभामंडप व पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भिमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प.कु दिव्याताई रनमले काळीकर (आळंदीकर) यांचा काल्याच्या कीर्तनाचा समाज प्रभोधनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच यात्रेत सलग तीन दिवस भजन, कीर्तन, होम-हवन, सत्संग,काकडा,भजन,महाप्रसाद भंडारा व सतिमाता ज्योत असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून त्यात दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजल्या पासून भजन व काकडा भजन होणार आहे 2 नोव्हेंबर रोजी सतिमातेच्या पुण्यतिथी निमित्त काकडा भजन, होम हवन,मातेच्या चरण पादुका पूजन, सत्संग भजन व कीर्तनकार मंडळींचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दि 3 ला सकाळी काकड आरती,भजन होईल नंतर 8 ते 12 या वेळेत शिवमाऊली संगीत संच माळबोरगाव यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होईल.
त्या नंतर दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे 1 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हरी भक्त पारायण कुमारी दिव्याताई रनमले यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात केला आहे तर दुपारी 2:30 वाजता सतिमाता ज्योत व काल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान सकाळ पासून भव्य महाप्रसाद-भंडारा या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे यात्रेच्या अनुषंगाने बेलदार समाजातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचक्रोशातील भाविक भक्त व नागरिकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या पवित्र कालावधीतील मातेच्या दर्शनाचा व त्या निमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बेलदार ओड समाज किनवट माहूर तालुक्यासह अखिल भारतीय समस्त बेलदार ओड समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत