किशोर मडगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेची शाखा उभारणी व भव्य पक्षप्रवेश सोहळा!
“महाकाली कॉलरी, प्रकाश नगरात मनसेचा झेंडा लहरावला, हजारो युवकांचा पक्षप्रवेश”
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : मनसेच्या जिल्हा सचिव श्री. किशोर मडगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर रोजी महाकाली कॉलरी प्रकाश नगर येथे मनसेची नवी शाखा भव्य सोहळ्यात उघडण्यात आली. या प्रसंगी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. किशोर मडगुलवार हे नेहमीच समाजकार्याच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या न्याय, हक्क आणि समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात.
शाखेचे उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार व माजी नगरसेवक व चंद्रपूर शहराध्यक्ष सचिन भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पश्चात, मनसेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शेकडो युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत भव्य पक्ष प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत, सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच शहराध्यक्ष सचिन भोयर यांनी सांगितले की, “विकास करायचा असेल, तर आता मनसेशिवाय पर्याय नाही” व राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना आव्हान दिले.
यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनोज तांबेकर, बल्लारपूर तालुका मनसे महिलासेना अध्यक्षा कल्पना पोर्तलावार, प्रकाश नागरकर, वर्षा बोमले, पोंभूर्णा मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम, चंद्रपूर ता. उपाध्यक्ष प्रविण शेवते, मनसेचे रुग्णमित्र कृष्णा गुप्ता, मयुर मंदनकर, राजु देवांगण, साहील पटान तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.
सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मनसेच्या झेंड्यासाठी व पुढील सामाजिक कार्यासाठी कटिबद्धता दर्शवली, तर हा कार्यक्रम चंद्रपूरमधील मनसेसाठी ऐतिहासिक ठरला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत