Breaking News

माणिकगड पहाडावरील अनेक गावांतील जलजीवन मिशनचे कामे निधीअभावी अपूर्ण

कंत्राटदारांना कामाचा मोबदला न मिळाल्याने थांबवले काम

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी,जिवती :- माणिकगड पहाडावर मोठा वाजा- गाजा करून जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र,

कंत्राटदाराला पैसे न मिळाल्याने जिवती तालुक्यातील अनेक गावांतील जल जीवन योजनेच काम बंद पडले आहेत. या समस्येमुळे ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावते,    योजनेचे कामे काही गावात प्रगतीपथावर व काही गावात कामे सुरू असताना. मात्र ज्या कामे सुरू होती त्याप्रमाणे मोबदला कंत्राटदाराला न मिळाल्याने त्यांनी काम थांबवले यामुळे  योजना बंद पडलेल्या आहेत. शासन व प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे जल जीवन मिशनचे कामे रखडली आहे. यामुळे सर्वसामान्य  जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो.

केंद्र सरकारने मागील दीड वर्षांपासून जलजीवन मिशनसाठी निधी देणे थांबवले आहे. राज्य सरकारकडूनही निधी उपलब्ध केला जात नसल्याने ही योजना पूर्णतः थांबली आहे. या योजनेचे मार्च २०२४ पर्यंतचे उद्दिष्ट होते, परंतु ते वेळेत पूर्ण झाले नाही, ज्यामुळे निधी रोखला गेला आहे. 

राज्य सरकारकडूनही त्यांच्या वाट्याचा निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जाते.

या योजनेसाठी मार्च २०२४ ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती, जी आता उलटून गेली आहे.

परिणामी निधीअभावी विविध योजनाचे काम थांबले आहे, शासन व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावातील जलजीवन मिशन योजनेचे कामे बोगस निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागांनी बोगस कामाची चौकशी करावी.  तालुक्यातील अनेक गावातील नळ योजना अपूर्ण आहेत. त्यामुळे  कामे पूर्ण करण्यासाठी नवीन निधीची आवश्यकता आहे.

मात्र तरीदेखील निधी केंद्र तसेच राज्य सरकारकडून देण्यात येत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पाणी पुरवठा विभागातर्फे एक समिती नेमण्यात येत असते आणि त्या समितीच्या माध्यमातून कंत्राटदाराचे बिल काढण्यात येतात. ती समिती फेल झाली असल्याचे आरोप कंत्राटदाराकडून होत आहे. या कारणामुळे   कंत्राटदारांनी काम बंद केले असून ही समस्या एका गावाची नसून तालुक्यातील अनेक गावांतील आहे.जिवती तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळ योजनेचे काम निधीअभावी बंद पडले आहेत. तरीदेखील शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याचे कंत्राटदरानेचे आरोप आहे.

यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तरी या समस्येला शासन व प्रशासनाने गांभीर्याने घेत निधि उपलब्ध करून द्यावा जेणेकरून अर्धवट असलेले नळ योजनेचे कामे पूर्ण करता येईल आणि ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल. अपूर्ण असलेले कामे पूर्ण करा.अन्यथा  आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सय्यद शब्बीर जागीरदार यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत