धुळी मुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात क्रीडा संकुल रोड कचरा फेकणे व जाळणे तात्काळ बंद करण्याची मागणी
धुळी मुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात क्रीडा संकुल रोड कचरा फेकणे व जाळणे तात्काळ बंद करण्याची मागणी
संदीप श्रीहरी पोडे यांचा विसापूर ग्रामपंचाय कार्यालय समोर कचरा फेको आंदोलनाचा ईशारा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ५ मधील पावर हाऊस - रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असून कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. या गंभीर समस्येबाबत आज ग्रामपंचायत कार्यालयाला बल्लारपूर तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा श्री. संदीप भाऊ पोडे यांच्या तर्फे अधिकृत निवेदन देण्यात आले.
या परिसरात कचरा जाळल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरत असून लहान मुले, वृद्ध नागरिक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचेही गंभीर नुकसान होत आहे. कचरा जाळणे हे शासनाच्या नियमांचे उल्लंघन असूनही संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये कचरा फेकणे व कचरा जाळणे तात्काळ बंद करावे, नियमित कचरा उचल व्यवस्था सुरू करावी आणि स्वच्छतेची योग्य अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जर या बाबत तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात आली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर “कचरा फेको आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.
सदर निवेदन संदीप श्रीहरी पोडे (बल्लारपूर तालुका अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा) यांनी ग्रामपंचायत कार्यालय विसापूर ला दिले,
त्या वेळी श्री. सतीश जी पाटणकर, श्री, सतीश वाघाडे, श् श्री. मोहितकर जी, श्री. पिंन्नू कष्टी जी, श्री. राहुल मोहीतकर जी, श्री. आकाश टोंगे जी, श्री. प्रदीप धोटे जी, श्री. नितिन पाडे जी, श्री.एकनाथ पारशिवे जी, श्री. सचिन नागपुरे जी, श्री. अतिश गिरडकर जी, श्री. चेतन पाल जी, श्री. प्रथम कष्टी जी, व सर्व युवक उपस्थिती होते त्या वेळी सरपंच साहेबा यांनी या विषयाला गंभीर्यानी घेऊन लवकरत लवकर योग्य मार्ग काढून देण्याचे आश्वासन दिले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत