देशमुख सुवर्ण पदाचे मानकरी
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, बेला : परिसरातील वनपरिक्षेत्र आमघाट येथील साहाय्य्क परिक्षेत्र अधिकारी रामेश्वर एन. देशमुख यांनी ऑल इंडिया फॉरेस्ट स्पोर्ट्स मीट 2025 च्या कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक चे मानकरी ठरले.
देशभरातून देहरादून (उत्तराखंड) येथे नुकत्याच पार पडलेल्या 28 व्या ऑल इंडिया फॉरेस्ट स्पोर्ट्स मिट वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आमघाट येथील सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी रामेश्वर देशमुख यांनी कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक पटकविले. भारतातून 36 राज्य व केंद्रशासित प्रदेशातून अनेक खेळाडूनी उपस्थिती दर्शवली होती . श्री देशमुख यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. अंतिम सामन्यात कॅरम डबल्स या प्रकारात मिझोरामच्या खेळाडूचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले.
रामेश्वर देशमुख हे नागपूर वन विभागाअंतर्गत वनपरिक्षेत्र बुट्टीबोरी प्रादेशिक अंतर्गत आमघाट येथे कार्यरत आहे. राष्ट्रीय स्तरावर वनविभागाचा मान उंचवल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी वि. एन. वाडे , वनपाल गजेंद्र राठोड , विशाल थापडे , पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज कांबळे , विनोद डांगरे दिनेश गोळघाटे, संजय मंदे, सुनील गावंडे , किशोर बानकर , अशोक नकले आदी नी अभिनंदन केले.
बातमी संकलन : दिनेश गोळघाटे, बेला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत