दिलीप मॅकलवार जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित
दिलीप मॅकलवार जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, पोंभुर्णा : दिनांक 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पोंभुर्णा येथील पत्रकार भवनात पत्रकार दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी 6 वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोंभुर्णा तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिवन गौरव पुरस्कार 2026 हा मानाचा पुरस्कार आदरणीय माजी अर्थ, नियोजन तथा वनमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते दैनिक तरुण भारत चे पत्रकार दिलीप मॅकलवार यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सुलभा पिपरे, ऊपनगराध्यक्ष अजित मंगळगिरिवार, तहसीलदार मोहनीश सेलवटकर, माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज गोरंतवार उपस्थित होते. दिलीप मॅकलवार यांचे तरुण भारत परिवार आणि मित्र मंडळी करुन अभिनंदन करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत