नायवाडा येथिल जल जिवनचे काम तत्काल सुरु करा सुनिल राठोड यांची मागणी
नायवाडा येथिल जल जिवनचे काम तत्काल सुरु करा सुनिल राठोड यांची मागणी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : गेल्या चार वर्षापासुन सुरु असलेल्या जल जिवन मिशन अंतर्गत विहीर बांधकाम रखडलेल्या अवस्थेत आहेत शासनाने या योजनेची अमलबजावनी केली होती मात्र निधी अभावी ही योजना सर्वत्र रखडलेली आहे अस्यातच सोरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत नायवाडा येथे येथे प्रादेशिक पाणीपुरवठा आधिपासुन सुरु होत मात्र शासन जलजिवन मिशन योजना अमलात आणल्या पासुन प्रादेशिक पाणीपुरवठा ग्रामपंचायत मार्फत चालवा असे निर्देश दिले मात्र ह्या योजनेचा बजेट दिवसेंदिवस मोठा होत असल्याने ग्रामपंचायत चालवु शकत नाही, नायवाडा येथे पाण्याची भिशन टंचाई भासु लागली आहे, म्हणून शासनाने सुरु केलेल्या जल जिवन मिशनचे रखडलेले काम तत्काल सुरु करण्यात यावे करीता सोरेकसा ग्रामपंचायत सदस्य सुनिल राठोड यांचे उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रा मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परीषद चंद्रपुर व गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती जिवती यांना निवेदन देण्यात आले आहे एक फेब्रुवारी पंर्यंत रखडलेल्या कामाला सुरुवात केली नाही तर पंचायत समिती जिवती येथे बेमुद्दत आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आले आहे या वेळी उपस्थित ग्रामवाशी दत्ता राठोड राजेन्द्र राठोड रामेश्वर राठोड गणेश पवार नामदेव राठोड प्रकाश राठोड नामदेव जाधव अशोक राठोड शिवाजी राठोड रमेश जाधव विलेश जाधव ग्रामपंचायत सचिव बोरकर साहेब आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत