विद्यार्थ्यांनी कायद्याचे शिक्षण घ्यावे ! सपोनी उमेश नासरे
विद्यार्थ्यांनी कायद्याचे शिक्षण घ्यावे ! सपोनी उमेश नासरे
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, बेला : स्पर्धेच्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक बाबतीत अपडेट असायला पाहिजे. पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारिक ज्ञान सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी याच काळात प्राथमिक कायद्याचे तरी शिक्षण घ्यायला पाहिजे असे बेला येथील नवनियुक्त ठाणेदार उमेश नासरे यांनी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवसानिमित्त आज लोकजीवन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य नितीन पुरी , पो. उपनिरीक्षक खंडेराव बोलगीर , संतोष चव्हाण , संजय वडपल्लीवार, आशिष देशमुख उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले एखादी अपराध जेव्हा घडतो तेव्हा आरोपीला विविध समस्यातून समोर जावे लागते. पोलीस स्टेशन मधील विविध विभागाची रचना , विविध शाखा मार्फत कसे कामकाज चालते, सोशल मीडियाचा वापर , नवीन कायदे , वाहतूक नियम , सायबर फ्रॉड तसेच इतर विषयाबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करायची असेल तर वायुसेना स्थरसेना , जलसेना , पोलीस विभाग सोबतच विविध संरक्षण विभागाची सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. असे खंडेराव बोलगीर यांनी म्हटले. सोबतच वाहतुकीचे नियम कसे पाळायचे वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी. शक्यतो विद्यार्थ्यांनी वाहतूक चालवण्याचा परवाना मिळेपर्यंत वाहन चालवू नये ! वाहतूक पोलीस सतीश फुटाणे, अमोल काळे , प्रशांत कुंभारे यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवसाचे निमित्ताने विद्यार्थ्यांनी गावामध्ये जनजागृती म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राजेश शिवरकर तर आभार बीड जमादार दारासिंग राठोड यांनी केले. पायल खातखेडे , निलेश बिजवाड,सत्येंद्र रंगारी ,निलेश पिंपळे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत