लक्कडकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
लक्कडकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी, चंद्रपूर : दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय लक्कडकोट येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, थोर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत लक्कडकोटच्या सरपंच सौ. सजनाबाई आत्राम होत्या. यावेळी उपसरपंच सौ. कमलाबाई राठोड, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद रतनकर, श्री. विजय कांबळे, सौ. सुष्माताई कुमरे, तसेच पोलीस पाटील श्री. देविदास कातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. मनोज मुन, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शीलाताई दिलीप जाधव, आशा वर्कर सौ. मंगलाबाई प्रकाश रामटेके, सौ. सीमाताई कोरवते, ग्रामपंचायत संगणक परिचालक श्री. रवि दुर्गे, ग्रामपंचायत कर्मचारी सौ. पंचशीला रामटेके, कु. तेजश्री आत्राम यांच्यासह लक्कडकोट येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, प्रशासन कौशल्य व लोककल्याणकारी विचार यावर प्रकाश टाकला. शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीने अंगीकारावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रम शांततामय वातावरणात व उत्साहपूर्ण सहभागाने पार पडला. ग्रामपंचायत लक्कडकोटच्या वतीने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
बातमी संकलन : प्रविण चिडे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत