Breaking News

आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी


(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) खेमचंद नेरकर,वरोरा : आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2022 ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

   सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समिती आनंदवन चे विश्वस्त आदरणीय सुधाकरजी कडू सर हे होते तर मुख्य अतिथी सन्माननीय रविंद्र नालगींटवार ,तर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे (टोंगे) यांची उपस्थिती होती.

    कार्यक्रमाचे सुरवातीला मान्यवरांच्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर दहावीच्या विद्यार्थिनीं प्रियंका व तेजस्विनी चौधरी यांनी स्वागतगीत गायन केले.

     कार्यक्रमात विद्यार्थी निर्भय 

नलगिंटवार ,प्रियंका वाकडे,शीतल रौतेल, व आदि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.वंश जाजू याने चारोळ्या सादर केल्या.

   त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यानी सामूहिक गीत गायन केले.विद्यार्थ्यांनी आपला जीवनातील संकल्प कोणता यावर आपाआपली मते व्यक्त केली.

     कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य होते.स्त्रियांच्या कार्याचे मूल्यमापन झाले पाहिजे.पुरुषाचे मूल्यमापन होत असते परंतु स्त्रियांच्या कष्टाचे सुद्धा मूल्यमापन होणे तेवढेच गरजेचे आहे.स्त्री हि पुरुषापेक्षा कष्टाळू आहे.असे प्रतिपादन आदरणीय सुधाकरजी कडू सरांनी केले.

    कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रविंद्र नालगींटवार यांनी सुद्धा महात्मा फुलेंनी सावित्रीबाई च्या हातात ज्योत दिली.मुलगी शिकली पाहिजे यासाठी

सर्वात महत्वाची स्त्री आहे.पुस्तक वाचता ग्रहण किती करता याला महत्व आहे.हस्ताक्षर,मुद्देसूद उत्तरे लिहिण्याची प्रक्रिया,प्रश्न उलटा आला तर 360 डिग्रीने विचार करा.शिक्षण परिक्षेपुरते नाही तर माणसाचे आयुष्य घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे.

असे प्रतिपादन नलगींटवार सरांनी केले.

    त्यानंतर कार्यक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका विद्याताई गोखरे यांनी सावित्रीबाई फुले बाबत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकून एक गीत सादर केले.

     कार्यक्रमाचे संचालन सृष्टी उरकुडे व प्रिया सलामे यांनी तर आभारप्रदर्शन सोहन ढोके यांनी केले.

    कार्यक्रम समारोप नंतर मुलांचे गायन व नृत्य चा कार्यक्रम घेण्यात आला .त वर्ग नववी व दहावीच्या मुला-मुलींचा कबड्डी हा सांघिक खेळ घेण्यात आला.या खेळामध्ये मुलांच्या स्पर्धेत वर्ग दहावीचा संघ तर मुलींच्या स्पर्धेत दहावीचा संघ विजयी झाला.

   कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक मयुर गोवारदिपे, आशिष येटे, प्रदीप कोहपरे, शिक्षिका स्मिता काळे,निशा येरणे ,प्रकाश नाकाडे यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत