Breaking News

वरोरा खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष गिरीधर कष्टी यांच्यावरील अविश्वास ठराव पारित

 वरोरा खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष गिरीधर कष्टी यांच्यावरील अविश्वास ठराव पारित 



(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) खेमचंद नेरकर,वरोरा : येथील शेती खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष गिरीधर नारायण कष्टी यांच्यावर नुकताच 15 पैकी 13 संचालकांनी अविश्वास ठराव आणून आज सहाय्यक निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत ठराव संमत झाला असल्याने गिरीधर कष्टी हे पायउतार झाले आहे.

    येथील एकेकाळी नावाजलेली खरेदी-विक्री संस्थेकडे काहीही उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने संस्था संपूर्णपणे आर्थिक डबघाईस आली आहे. मात्र नियमाप्रमाणे संस्थेची निवडणूक घेणे क्रमप्राप्त असल्याने पाच वर्षापूर्वी निवडणूक घेण्यात आली असता डॉ.विजय देवतळे यांच्या गटाचे आठ सदस्य व स्वर्गीय संजय देवतळे यांच्या गटाचे सात सदस्य अशी एकूण पंधरा सदस्य यांची काही जागा वगळता बिनविरोध निवडणूक झाली होती. डॉ.विजय देवतळे यांच्या गटाचे अध्यक्ष म्हणून गिरीधर कष्टी यांची त्यावेळी निवड करण्यात आली होती मात्र मागील दोन-तीन वर्षापासून गिरीधर काष्टी यांनी संचालकांना विश्वासात घेत नसल्याने 15 पैकी 13 सदस्यांनी डॉ.विजय देवतळे व करण संजय देवतळे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष गिरीधर कष्टी यांच्यावर अविश्वास आणण्याकरिता जिल्हा निबंधक चंद्रपूर यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 57(1) च्या तरतुदीनुसार त्यांच्यावर सहाय्यक निबंधक कार्यालयात अविश्वास ठराव बाबत सभा घेण्यात आली असता सभेला 13 सदस्य उपस्थित होते. त्यापैकी सर्व संचालकांनी गिरीधर कष्टी यांच्यावर विश्वास नसल्याच्या ठरावाला संमती दर्शवल्याने गिरीधर कष्टी पायउतार झाले.

      ठरावाच्या बाजूने उपाध्यक्ष विजय मोकाशी, संचालक साहेबराव ठाकरे, विठ्ठल भोयर,चेनकरण सोम, प्रदीप मत्ते, प्रमोद धात्रक, हरिदास पचभाई,दत्तूजी उताणे, नथुजी नरांजे, सुभाषराव वाढई, जनार्दन भोयर, सौ लीलाताई देवतळे,गुंफाताई आसुटकर इत्यादी सदस्यांनी हात वर करुन ठरावाच्या बाजूने मतदान केले व ठराव संमत झाला. मात्र अध्यक्ष व एक सदस्य अनुपस्थित होते. सभेचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक निबंधक डी . यु.शेकोकर हे असून त्यांनी संपूर्ण कामकाज सांभाळले.त्यांना सहकार्य सचिन गौरखेडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत