Breaking News

दोंदे नगर एकार्जुना येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालकदिन साजरा

 दोंदे नगर एकार्जुना येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालकदिन साजरा


(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) खेमचंद नेरकर,वरोरा : समाजातील प्रत्येक घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस साजरा करण्यात आला.

   कार्यक्रमाचे सुरवातीला उपस्थित मान्यवरांचे हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.

      सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या मुख्याध्यापिका असून त्या अशिक्षित होत्या परंतु महात्मा फुलेंनी त्यांच्या हातात शिक्षणाची ज्योत दिली आणि मुलींना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी पुणे येथील बुधवार पेठेत पहिली शाळा काढली.सावित्रीबाईंना समाज द्रष्टे शेण ,गोटे मारत असतांनाही त्यांनी मुलींना शिकवून सुशिक्षित करण्याचे समाजकार्य सोडले नाही.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

  कार्यक्रमात भारतीय ग्रामिण पत्रकार संघ , सामाजिक महिला मंच च्या संपर्क प्रमुख अल्काताई पचारे,अ.भा.ग्रा.पत्रकार संघ व सामाजिक महिला मंच च्या जिल्हा संघटिका रजनीताई मेश्राम,अंगणवाडी सेविका लता वरूटकर, संगीता निखाडे,एकार्जुना सरपंचा उज्वलाताई थेरे,वैशाली उपरे,बाली कोरडे,करिष्मा खुटाळकर,सुषमा मिलमीले,सत्यभागा खेकारे, छाया करलुके व आदि महिला आणि बालक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत