नागपूरमधील भांडेवारी परिसरात पतंगबाजी बेतली जीवावर
12 वर्षांच्या मोहितचा घराच्या छतावरून पडून मृत्यू
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नागपूर : पतंग उडवणे लहान मुलाच्या जीवावर बेतल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. पतंग उडवत असताना घराच्या गच्चीवरून कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमधील भांडेवारी परिसरात घडली आहे. या तरुणाच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील भोले नगरमध्ये ही घटना घडली आहे. मोहित शाहू असं 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. मोहित हा घराच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट घराच्या गच्चीवरून खाली कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.
मोहितच्या घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मोहितला मृत घोषित केले. परंतु, घटनेनंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मोहितचा मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयाने आधी पैशाची मागणी केली तर सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत