Breaking News

‘पुष्पा’तील सीनची सांगलीत पुरावृत्ती, अडीच कोटीच्या रक्तचंदनाची तस्करी ; टोळी जेरबंद

 ‘पुष्पा’तील सीनची सांगलीत पुरावृत्ती, अडीच कोटीच्या रक्तचंदनाची तस्करी; टोळी जेरबंद


(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) सांगली :  पुष्पा या चित्रपटाची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली आहे. रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल अडीच कोटीचे चंदन जप्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चंदनतस्करीचे रॅकेट कर्नाटक असल्याचे समजते आहे.

सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. यामध्ये असलेल्या 2 कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून जप्त केले आहे.

यावेळी यासिन इनायतउल्ला खान (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशमधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते, यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला आहे.याची मोठी चर्चा सर्वत्र चालू असतानाच अशाच प्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधीक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने व वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत