अबब! महिलेच्या पोटात होता आठ किलोंचा गोळा; नागपूरच्या मेडिकलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
अबब! महिलेच्या पोटात होता आठ किलोंचा गोळा; नागपूरच्या मेडिकलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नागपूर : अयोध्यानगरातील एक महिला पोटदुखीच्या त्रासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) दाखल झाली. उषा कडवे असं त्यांचं नाव. ही महिला साठ वर्षे वयाची आहे. तिच्या वेदना लक्षात घेता डॉक्टरांनी तिला भरती करून घेतले. गेल्या काही दिवसांपासून त्रास असल्याचं तिनं डॉक्टरांना सांगितलं. मेडिकलमध्ये तिचे सोनोग्राफी, सीटी स्कॅन करण्यात आले. यामध्ये तिच्या पोटात अंडाशयाची गाठ असल्याचे डॉक्टरांना कळलं. कॅन्सरसदृश्य गोळा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, यानंतर सर्व चाचण्या करण्यात आल्यात. डॉक्टरांनी सल्लामसलत करून शस्त्रक्रिया (Surgery) करण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या पोटातून अंडाशयाचा चक्क आठ किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. डॉक्टरांच्या प्रसंगावधानाने संबंधित महिलेचे प्राण वाचले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत