अल्पवयीन आते बहिणीवर मामेभावाने केला अत्याचार, पीडित 3 महिन्याची राहिली गरोदर!
अल्पवयीन आते बहिणीवर मामेभावाने केला अत्याचार, पीडित 3 महिन्याची राहिली गरोदर!
वर्धा : वर्ध्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एक गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मामेभावाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात 55 वर्षाच्या नराधमाणे 3 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली होती. आता पुन्हा अशीच घटना पुन्हा उघड झाल्याने वर्धेकरांना चांगलाच हादरा बसला.
हेही वाचा : दिव्यांगाणा ५%टक्के निधि त्वरित वितरित करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयांवर चळून विरुगिरीने आंदोलन करु
हिंगणघाट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीकच्या एका गावातील पीडित अल्पवयीन मुलीचा मामेभाऊ हा तिच्याच घरी राहत होता. घरातीलच असल्याने मामेभावाने कधी मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले घरच्यांना कळलंच नाही. मात्र मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला शहरातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी आणले असता मुलगी 3 महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा : 21 वर्षीय तरुणीच्या हातून जन्मदात्या वडिलांची हत्या, लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे आले समोर
घटनेची तीव्रता लक्षात घेता डॉक्टरांनी हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी चौकशी करीत आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत (पास्को) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोस्को सेलच्या साय्यक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगडसह पोलीस कर्मचारी करीत आहे. आणखी बातम्या वाचण्याकारीटा इथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत