Breaking News

बसच्या चाकासोबत गेल्या घासत , 75 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

 बसच्या चाकासोबत गेल्या घासत , 75 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

(महा घाडामोडी न्यूज नेटवर्क) पुणे : पीएमपीएमएल बसखाली  येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. बसच्या चाकाखाली आल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले. पुण्यात हा दुर्दैवी अपघात झाला. पादचारी महिला रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. यामध्ये 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पद्मा पंढरीनाथ गायकवाड असं मयत महिलेचं नाव आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात हा प्रकार घडला. विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे पीएमपीएलएम बसच्या मागील चाकाखाली त्या आल्या होत्या. त्यानंतर बससोबत काही अंतर त्या फरफटत गेल्या. त्यामुळे जागीच त्यांचा करुण अंत झाला. या प्रकरण संबंधित पीएमपीएमएल बसचा चालक आणि वाहक या दोघांना बससह विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Propose Day नंतर, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन ग्रुपमध्ये तुफान हाणामारी

काय आहे प्रकरण? पीएमपीएमएल बसखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे वृद्धा काही अंतर फरफटत गेली. या अपघातात पद्मा पंढरीनाथ गायकवाड या 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.

हेही वचा : व्हॉइस ऑफ मिडीया च्या मराठवाडा अध्यक्षपदी विजय चोरडिया यांची निवड

नेमकं काय घडलं? पद्मा गायकवाड रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली त्या आल्या. त्यामुळे जागीच त्यांचा करुण अंत झाला. मुकुंदराव आंबेडकर चौकात हा प्रकार घडला.

हेही वाचा : भररस्त्यात पत्नीवर चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, हल्ला केल्यानंतर आरोपी पती फरार

बस चालक-वाहक ताब्यात अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. अपघात प्रकरणी संबंधित बसचा चालक, वाहक यांना बससह विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा 

हेही वाचा : चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत