Breaking News

गुंडांच्या दोन गटात मारहाण, नागपुरात रात्री अपहरणाचा थरार;

गुंडांच्या दोन गटात मारहाण, नागपुरात रात्री अपहरणाचा थरार;

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नागपूर : कुशीनगरचा राज प्रभू इलमकर हा गूंड प्रवृत्तीचा आहे. त्याचे दोन दिवसांपूर्वी एका युवकाशी भांडण झाले. मंगळवारी बाजारात बुधवारीही चांगलेच कडाक्याचे भांडण झाले. राज आणि दुसरा युवक यांनी एकमेकांना मारहाणही केल्याची माहिती आहे. या घटनेमुळं राजचे विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी राजचा संपविण्यासाठी प्लॅन आखला. आठ ते दहा जण ऑटोने राजच्या घरी गेले. रात्री आठच्या दरम्यान त्याला घरी शोधले. परंतु, राज घरी नव्हता. त्यामुळं आरोपी आणखी संतापले. राजच्या घरी तोडफोड केली. कुठे गेला राज म्हणून घरच्यांना विचारणा केली. त्यानंतर ते ऑटोसह दयानंद पार्कजवळ पोहचले. राजला चाकूचा धाक दाखवला. राजला घेऊन आरोपी पसार झाले. खुलेआम घटना घडल्याने उपस्थित नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा : बसच्या चाकासोबत गेल्या घासत , 75 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

गूंड समोर, पोलीस मागे झोन पाचचे डीसीपी मनीष कलवानिया यांच्या नेतृत्त्वात तपास सुरू झाला. राजचा मोबाईल ट्रेस करण्यात आला. पन्नास पोलिसांची चमू कामाला लागली. राजचा पाठलाग करू लागले. राजला जरीपटक्यावरून पाचपावलीच्या दिशेन आरोपी घेऊन जात होते. बडकस चौक, कोतवाली, गंगाबाई घाट मार्गाने केडीके कॉलेज चौकात राजला घेऊन आरोपी पोहचले. तिथं नाल्याच्या झुडपात घेऊन गेले. पोलीस पाठलाग करीत होते. त्यामुळं आरोपी पळाले. शेवटी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

गुंडांना भीती राहिली नाही का? जखमी राजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपींचा शोध घेत होते. या थरारक घटनेनं नागपूर हादरले आहे. गूंड प्रवृत्ती वाढत असून खुलेआम अपहरणाच्या घटना घडत आहेत. त्यामुळं गुंडांना भीती राहिली नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी तत्काळ दखल घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली. रात्री घडलेल्या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा 

हेही वाचा : भररस्त्यात पत्नीवर चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, हल्ला केल्यानंतर आरोपी पती फरार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत