Breaking News

चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं

 चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) मुंबई : लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ बहिणीला चाकूचा धाक दाखवून त्यांची लूट करण्यात आली. दोघांकडे असलेला मोबाईल, बॅग खेचून चोरटे पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. या चार चोरट्यांपैकी एका चोरट्याला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं. सोमवारी (काल) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ठाणे जिल्ह्यात मध्य रेल्वेवरील शहाड रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. संजू उर्फ सोनू मस्तान राऊत असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोध घेत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल दाखल आहेत. गेल्या काही काळापासून आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.

हेही वाचा : पिकासाठी औषधी आणायला गेला भाऊ, रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

नेमकं काय घडलं? सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित भाऊ बहीण आंबिवली रेल्वे स्थानकाहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. आंबिवलीहून लोकल सुरू होताच लोकलमध्ये गर्दी नसल्याची संधी साधत चार तरुण त्यांच्याजवळ आले. यामधील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत या दोघांजवळील बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतले.

हेही वाचा : नागपूर : तहसीलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ; १६ जणांना अटक

एका चोरट्याला प्रवाशांनी पकडलं इतक्यात शहाड रेल्वे स्टेशन आले आणि या चारही तरुणांनी ट्रेनमधून उतरून पळ काढला. दोघा भाऊ बहिणीने आरडाओरड केल्याने स्टेशनवरील प्रवाशांनी सतर्कता दाखवली आणि पळून जाणाऱ्या एका चोरट्याला पकडलं, मात्र त्याचे तिघे साथीदार निसटण्यात यशस्वी ठरले.

हेही वाचा : क्रिष्णा नदीच्या काठी आईसोबत सरपण गोळा करायला गेलेल्या दोन चिमुकल्यांची कृष्णा नदीत समाधी

या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजू उर्फ सोनू मस्तान राऊत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोध घेत आहेत.

हेही वाचा : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाचा कांड उघड, पोलिसांमुळे नवरदेवाचं 'हनिमून' लॉकअपमध्ये

सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अटक आरोपी संजीव आणि फरार आरोपी छोटू पापा यांच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र रेल्वेत अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा 

हेही वाचा : घरमालकिणीचा अनैतिक संबंधांना नकार, भाडेकरुकडून 30 वर्षीय विवाहितेची हत्या, बाथरुममध्ये मृतदेह आढळला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत