Breaking News

फैजपूर धनाजी नाना महाविद्यालय येथे सकाळ यिन तर्फे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

 फैजपूर धनाजी नाना महाविद्यालय येथे सकाळ यिन तर्फे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) दिपक तायडे, रावेर : फैजपूर धनाजी नाना महाविद्यालय येथे सकाळ यिन तर्फे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले  शिवजयंती १९/०२/२०२२ रोजी   सकाळ यिन अधिकारी अ‍ॅड. सुकन्या महाले यांच्या ऑनलाईन उपस्थितीत  धनाजी नाना महाविद्यालयाचे क्रिडा अधिकारी डॉ. गोविंदराव मारतळे सर यांनी अध्यक्ष स्थान स्विकारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना शिवरायांची थोर पराक्रमी इतिहासाची माहिती सांगून खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले शरीर कशा प्रकारे निरोगी व मजबूत ठेवावे आणि आपल्या आयुष्यात शिवरायासारखे ध्येय ठेवून आपण यश गाठले पाहिजे अशे मार्गदर्शन डॉ. गोविंदराव मारतळे सर यांनी विद्यार्थ्यांना केले.. यावेळी सकाळ यिन धनाजी नाना महाविद्यालय अध्यक्ष गौरव राजेंद्र महाजन, नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन भुषण जिवन तायडे,निलेश महाजन, अनिकेत हिरोळे, रितिक बोहित, प्रनील तायडे व विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत