शिवजयंती दिवशी अर्जुनी-मोर पोलिसांची अनोखी भेट!
चोरीस गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने व टीव्ही फिर्यादीला केला परत!
(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) गोंदिया : दिनांक 16/01/2022 रोजी पहाटे अर्जुनी-मोर येथील ज्ञानेश्वर पांडुरंग शहारे यांच्या घरी कोणी नसताना आरोपींनी घरफोडी चोरी करून त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व एक 43 इंची कलर टीव्ही चोरून नेला होता.
अर्जुनी-मोर पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेले भौतिक पुरावे, गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून तसेच तांत्रिक व शास्त्रीय माहितीच्या आधारे सर्व 3 आरोपी फरदिन राजीक शेख रा. वडसा, सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे रा. राजुरा विकास शर्मा राहणार वडसा यांचा शोध घेऊन दुर्ग छत्तीसगढ मधून अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून सर्व सोन्या-चांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही देखील हस्तगत केला होता.
मा. कोर्टाने जप्त केलेले सोन्या चांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही फिर्यादीला परत देण्याचा आदेश केल्याने आज रोजी अर्जुनी-मोर पोलिसांनी फिर्यादीला पोलीस स्टेशनला बोलून सर्व सोन्या चांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही त्यांच्याकडे सुपूर्त केलेले आहेत. अर्जुनी-मोर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.
या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे, मा. अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री अशोक बनकर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व पोलीस हवालदार गोंडाणे, पोलीस नाईक प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम, राहुल चीचमालकर, पोलीस शिपाई लोकेश कोसरे, मोहन कुहीकर यांनी केला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सायबर सेल गोंदिया येथील पोलीस नाईक दीक्षित दमाहे यांनी मोठी मदत केलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत