पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करी जवानाची आत्महत्या
पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करी जवानाची आत्महत्या
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) पुणे : लष्करातील जवानाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना वानवडी येथील सैनिक आवास परीसरातील आहे. धक्का़दायक म्हण़जे पत्नीच्या त्रासामुळे जवानाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आले. याप्रकरणी पत्नी तसेच सासरकडील व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
हेही वाचा ; मुल शहराच्या विकासात मोलाची भर
गोरख नानाभाऊ शेलार (वय २४) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असुन ते लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयात नियुक्तीस होते. शेलार यांनी चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यासंदर्भात शेलार यांचा भाऊ केशव यांच्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस ठाण्यात पत्नी तसेच सासरकडील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
शेलार यांचे गेल्या वर्षी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. पत्नीने शेलार यांना कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली, असा दावा शेलार यांच्या कुटूबीयांनी केलाय.आणखी बातम्या वाचण्या करिता इथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत