Breaking News

कोल इंडिया वेलफेअर बोर्ड सदस्य, इंटक चे राष्ट्रीय संघटन मंत्री तथा वे.को.ली. नागपूर चे महामंत्री आदरणीय के.के. सिंह यांनी एक दिवस लाक्षणिक उपोषण करून दिला नितीन भटारकर यांच्या उपोषणाला पाठींबा

 कोल इंडिया वेलफेअर बोर्ड सदस्य, इंटक चे राष्ट्रीय संघटन मंत्री तथा वे.को.ली. नागपूर चे महामंत्री आदरणीय के.के. सिंह यांनी एक दिवस लाक्षणिक उपोषण करून दिला नितीन भटारकर यांच्या उपोषणाला पाठींबा

महा घडामोडी न्यूज चंद्रपूर :- दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत कामगार व सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात नितिन भटारकर यांनी आमरण उपोषण आंदोलनाची सुरुवात दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासुन केली आहे. 

सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला सर्वसामान्य नागरिकांसह अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले आहे.

वेकोली परिसरात देखील वाघ, बिबट व अस्वलांचा मोठा धुमाकूळ आहे. यापूर्वी देखील स्वयंपाका करीता लाकडी काड्या जमा करणाऱ्या पती पत्नीला वाघाने मारले होते. एका वेकोली कर्मचाऱ्यावर अस्वलीने हल्ला करून मोठ्या प्रमाणात जखमी केले होते. परवा ज्या १६ वर्षीय मुलाला मारले होते त्याचा मृतदेह देखील वेकोलीच्या रिजनल स्टोअर मध्येच मिळाला होता.

 वेकोली वसाहत व लगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ असल्याने श्री. के.के.सिंह यांनी अनेकदा वन विभाग व वेकोलीच्या उच्च अधिकाऱ्यांना पत्र लिहिले, परंतु  वनविभागा तर्फे पाहिजे त्या उपाय योजना केल्या नाही. व म्हणून सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ वनविभागाने उपाययोजना करावी या मागणीला लक्ष वेधण्याकरीता आज श्री. सिंह यांनी आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले व आजच्या आंदोलनाची सुरुवात केली. 

यावेळी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट चे मुख्य संघटक आदरणीय बळीराज धोटे साहेब यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यारपण केले. 

यावेळी मा.भास्कर सपाट साहेब, मा. मनोहर जी भांडवलकर, मा. अविनाश लांजेवार साहेब, मा. किशोर ढुमणे साहेब, मा. प्रमोद बोरीकर साहेब, मा. भुल्लर साहेब, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ शेजुळ, मा. सरपंच अमोल ठाकरे, रावीका जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, पवन बंडीवार, संचित बुरीले, मनोज सोनी, सचिनजी मांदाळे, मा. उपसरपंच आसिफ खान पठाण, निशांत वाकडे, संजय रामटेके, गणेश यादव यांच्यासह युवा सहकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत