Breaking News

ग्राम पंचायत मरकलमेटा येथे एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाचे आयोजन

 ग्राम पंचायत मरकलमेटा येथे  एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाचे आयोजन

(महा घडामोडी न्यूज ता.प्रतीनिधी शेख हक्कानी) जिवती : तालुका कृषी अधिकारी जिवती अंतर्गत मरकलमेटा या गावी आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला एकत्मिक पाणलोट विकास कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाध्ये शेतीविषयी माहिती व कृषी विभागा कडून शेतकऱयांना मिळणाऱ्या वेगवेगळ्य़ा योजना बद्दल माहिती देण्यात आली. 

गावातील बचत गटाच्या महिलांना व पुरुषांना स्वयंरोजगार करण्याकरिता लागणारे साहित्य आणि त्या विषयी सर्व माहिती देण्यात आली.शेतपिकावर पडणारे रोग त्यावर उपाय  यावर चर्च्या करण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर _भाऊसाहेब भराटे यांनी पाणलोट क्षेत्राबद्द्ल व जैविक शेतीविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी _मंगेश पवार . तालुका कृषी अधिकारी कु.पी एस गोडबोले , कृषी सहाय्यक एम एन राठोड , जाधव , गेडाम ,डाखरे बोरकर , व कृषी पर्यवेक्षक पी एन ढाकणे हे उपस्थित होते . या कार्यक्रमा गावातील वैजनाथ सूर्यवंशी , संतोष कांबळे , किशन सूर्यवंशी , प्रभू कांबळे , बालेसाब सय्यद , मारोती कांबळे , अंगद कांबळे , अतिक सय्यद , दत्ता राजूरकर , बापूराव गायकवाड , विमलाबाई काम्ले , पिरुबाई कांबळे , कमलबाई गायकवाड , व इतर गावातील मंडळी उपस्थित  होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत