Breaking News

दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास सेवाग्राम पोलीसांनी केली नागपूर येथुन अटक

दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास सेवाग्राम पोलीसांनी केली नागपूर येथुन अटक


महा घडामोडी न्यूज नेटवर्क वर्धा : फिर्यादी श्री अशोक पोहाणे हे शिक्षक असून दत्तपूर येथे राहतात. दि. १६ •०३-२०२२ रोजी फिर्यादी हे त्यांचे राहते घराला सकाळी १०.३० वा. कुलूप लावून ड्युटीवर गेले व दुपारी ३.०० वा. घरी परत आले असता त्यांना त्यांचे घराचे दाराचे कुलूप तुटलेले दिसले फिर्यादी यांनी घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील १) नगदी १२,०००/- रू. २) टायटन कंपनीची हातघडी किंमत १०००/- ३) स्कुल बॅग किंमत ५००/- ४) दोन पॅन्ट व शर्ट पिस कि १०००/- ५) CCTV DVR CR+ कंपनीचा किंमत ४०००/- रू असा एकुण १८,२००/- रू. चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे दिसून आले. फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिल्याने अप. क्र. १५३/२०२२ कलम ४५४, ३८० भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपी नामे सम्मेत ऊर्फ पोग्या संतोष दाभने, वय २२ वर्ष, रा.. सुभाष नगर, नागपूर यास अटक करुन त्याचे जवळुन गुन्ह्यात चोरलेले १) टायटन कंपनीची हातघडी किंमत १०००/- २) दोन पॅन्ट व शर्ट पिस किंमत १०००/- ३) कडीकोडा तोडण्यासाठी वापरलेली सळाख, ४) पाटाचे दार उघडनेस वापरलेली कैची असा एकूण २०५०/- रु. चा माल जप्त करून नमूद गुन्हा उघडकीस आणला. आरोपीस सखोल विचारपूस केली असता आरोपीने पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीमधुन चोरी केल्याचे सांगितले त्यामुळे आरोपीकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे, पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार हरिदास काकड, गजानन कठाणे, प्रकाश लसूनते, पवन झाडे, अभय ईंगळे, सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत