रावेर तालुक्यातील चोरवड येथे नॅशनल हायवे लगत जुगाराला उत
रावेर तालुक्यातील चोरवड येथे नॅशनल हायवे लगत जुगाराला उत
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी दिपक तायडे, रावेर ; रावेर तालुक्यातील चोरवड हे गाव मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील बॉर्डर वर आहे ,तसे गाव रावेर पासून सुमारे 18 km वर आहे, परंतु जुगार खेळण्यासाठी येथे जुगारी फार दुरून येतात सदर जुगार हा गुडू यांच्या मालकीचा असून राजाने आणि इतर 20 ते 25 मुलं येथे देखरेख करतात आणि अड्डा मालक आरामाणे दररोज 1ते 2लाख रुपयांची बेकायदेशीर कमाई करत असतो. जशी जत्रा गाव खेड्यात भरते तसे स्वरुप या ठिकाणी जुगाराचा रूपाने पाहायला मिळते, हायवे रोड ने ही जुगारी मंडळी सहज लक्षात येते किंबहूना दिसते, या जुगारामुळे अनेकांची संसार बरबाद झाले पण क्लब चालक मात्र मालामाल झालेत. या ठिकाणी रात्रंदिवस पत्त्यांचा खेळ सुरू आहे परंतु जबाबदार यंत्रणा याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहे असे जाणवते तरी जिल्यातील पोलिस यंत्रणांनी यांच्याकडे जातीने लक्ष वेधून घेतलं पाहिजे अशी मागणी सुज्ञ नागरिक पोलिस प्रशासनास करत आहेत, अपेक्षा आहे की या अड्ड्या वर पोलीस धाडी टाकून जुगाराच्या आणि जुगरींच्या मुसक्या दाबतील व या भागातील जुगाराचे धंदे कमी होतील



कोणत्याही टिप्पण्या नाहीत