समाजात माझ्या अनेक चमकतील हिरे मिळाली आईची माया म्हणतील रमा सारे संदेश देवून तुजला ,गौतम अमर अमर ठरे
मणाचा माणूस...
समाजात माझ्या अनेक चमकतील हिरे
मिळाली आईची माया म्हणतील रमा सारे
संदेश देवून तुजला ,गौतम अमर अमर ठरे
थांब रमा थांब ग, लिहतो येवढ पाण ग
तुझ्या साठी आणि, तुझ्या लेखी साठी ग (धू
वेदना जिवाने या ग, पुष्कळ साहिल्या ग
पान ईतिहासाचे ग, एक एक ग्वाही देईल ग
थांब रमा थांब ग , लिहितो येवढ पण ग ( १
निरक्षर समाज हा, साक्षर होईल ग
सुधारण्या पोती ग, सामोर येयी लेखी ग
थांब रमा थांब ग, लिहितो येवढ पाण ग ( २
झिजली रमा बघती, जन हितासाठी ग
झिजवुनी दाव , काया तुही तिच्या पाठी ग
थांब रमा थांब ग , लिहितो येवढ पाण ग (३
ना खंत मजला ग, जरी जिव गेला ग
हिंदू कोड बिल ग , लिहिले पुर्ण आज ग
थांब रमा थांब ग , चिडतो गौतम आज ग (४
कवी पत्रकार : गौतम धोटे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत