Breaking News

कल्पतरू महिला संघातर्फे जागतिक महिला दिन साजरा

कल्पतरू महिला संघातर्फे जागतिक महिला दिन साजरा


महा घडामोडी न्युज नेटवर्क,भंडारा : शहरातील इंद्रलोक सभागृह येथे कल्पतरू महिला संघ भंडाराच्या वतीने मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न झाला. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भंडारा शहरात देखील ठीक-ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. शहरातील इंद्रलोक सभागृह येथे मात्र महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कौटुंबिक कलह, महिलांचा छळ या विषयाला घेऊन जनजागृतीपर नाटक सादर करण्यात आले. तसेच ड्रेस कॉम्पिटिशन चे देखील यावेळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला परीक्षक म्हणून सौ.सविता इलमकर सौ. निकिता पवन मस्के, शुभांगी सोनू खोबरागडे, या प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये महिलांसह लहान मुलींनीही सहभाग नोंदविला होता. यावेळी विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी क्रांतीची ज्योत पेटवून महिलांना अधिक बलशाली बनवू असा संकल्प घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता 
अध्यक्ष सौ.विद्या पराग सुखदेवे, वंदना सुखदेवे, भावना रंगारी, डॉ.ज्योती गणवीर, सविता ईलमकर, विद्या साखरे, कल्पना रामटेके, वंदना भोयर, किरण साखरे यासह कल्पतरू महिला संघाच्या अन्य महिला व शहरातील महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत