Breaking News

काँग्रेस नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, दुचाकीस्वारांनी बॅटने केली मारहाण


मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, दुचाकीस्वारांनी क्रिकेट बॅटने केली मारहाण



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी, चंद्रपूर : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. चंद्रपुरात ही घटना घडली आहे. बाईकवरुन आलेल्या तिघांनी काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर  यांना क्रिकेट बॅटने मारहाण केली आहे. या हल्ल्यात नगरसेवक नंदू नागरकर हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. तीन युवकांनी काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला केला आहे. नागरकर यांची दैनंदिनी ज्ञात असल्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरकर यांना दुचाकीस्वारांनी भरचौकात क्रिकेट बॅटने मारहाण केली आहे.

55% OFF OFFER

Mivi ThunderBeats 2 Upgraded Audio Bluetooth Wireless in Ear Earphones with Superior Sound, Powerful Bass, 14 Hours Playtime, Comfortable Fit, Bluetooth 5.0 | Headphones (Black)

तोंडावर मास्क घातलेल्या या युवकांनी आधी मुद्दाम गाडी आडवी घातली. मग अकारण भांडण उकरून काढत मराठी सिटी शाळा चौकात मारहाण केली. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले. नागरकर काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष- माजी स्थायी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत.

हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत चर्चांना उत आलाय. या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. या घटनेनंतर चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चंद्रपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत