आधी होतं भकास; आज उजळून निघालंय गाव; पोंभुर्ण्यातील आदर्श गावाची कथा
आधी होतं भकास; आज उजळून निघालंय गाव; पोंभुर्ण्यातील आदर्श गावाची कथा
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,संतोष मडावी,चंद्रपूर : गाव हे देशाचेचे खरे चेहरे. मात्र शासन, प्रशासनाचा दुर्लक्षाने काही गावांचे चेहरे विद्रूप झालेले. अनेक गावात मुलभुत सूविधांचाही अभाव दिसून येतो. अश्याच एका मागासलेल्या गावाने कात टाकली. गावात अनेक योजना राबविल्या गेल्या. गावकऱ्यांनी गावाला स्मार्ट गाव बनविण्याचे ठरविलं. अन् गावाचा चेहरा मोहरा बदलला. गाव उजळून निघालं. पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ हे आदर्श गाव बनले असून गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
पोंभुर्णा तालुक्यात येणारं घाटकुळ हे गाव वैनगंगेचा काठावर वसलं होतं. गोंड राजाचा काळात घाटकुळ हे फार मोठं परगणा होतं. गजबजलेलं असं हे गाव काळाचा ओघात भक्कास व लहान गाव झालं. वैनगंगेचा पुराचा फटका वारंवार बसत असल्याने गाव काठावरून हटविले गेलं. नदी काठापासून जवळपास एक कि.मी.अंतरावर गाव वसविलं गेलं.
गाव बसलं मात्र गावात सोयी सूविधा नव्हत्या. समस्यांचं माहेरघर बनलं. युती सरकारचा काळात अर्थ आणि वनमंत्री असलेल्या सूधीर मुनगंटीवार यांची गावावर नजर पडली. ग्राम प्रवर्तक या योजनेत गावाचा समावेश करण्यात आला. टाटा ट्रस्टचा माध्यमातून शेतशिवार फुललेत. गावात अनेक विकास योजना राबवविल्या गेल्या. यातून गावाचा चेहरा मोहराच बदलला. गावाला हरीतक्रांती, स्मार्ट गाव पुरस्कार मिळाले. सन २०१८-१९ मध्ये आदर्श गावाचा राज्यस्तरीय तिसरा पुरस्कार मिळाला. आज आहे त्यापेक्षाही सूंदर गाव बनवू ,असे सरपंच सूप्रीम गद्देकार यांनी म्हटलं आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत