Breaking News

महिलांचा योग्य सन्मान हेच काँग्रेसचे संस्कार--महेंद्र ब्राम्हणवाडे

शिवाई मित्र परिवार मंडळ, गडचिरोली च्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन


महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, सुखसागर झाडे गडचिरोली : महिलांचा सन्मान करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष असून पक्षाने देशाला पहिली महिला राष्ट्रपती, पंतप्रधान,लोकसभा अध्यक्ष, पक्ष अध्यक्ष सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वात आधी 50 टक्के आरक्षण देऊन नेहमीच महिलांचा सन्मान केला असून यापुढेही करत राहील असे प्रतिपादन जिल्हा काँगसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे शिवाई मित्र मंडळ,गडचिरोली च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात मुख्य अतिथी म्हणून यावेळी ते बोलत होते. विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेणाऱ्या जिल्ह्यातील महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सोबत महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष भावनताई वानखेडे, माजी न.प.सभापती प्रा.राजेश कात्रटवार, माजी नगराध्यक्षा निर्मलाताई मडके, माजी न.प.उपाध्यक्ष रमेश चौधरी, दिपकभाऊ मडके, काँग्रेस जेष्ठ नेते दामोदर मंडलवार, नंदू कायरकर, लताताई मुरकुटे, सह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत