भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, बोर्डाच्या या अध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, बोर्डाच्या या अध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, मुंबई : नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असलेलं बिहार क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश कुमार तिवारीवर छेडछाड आणि दुष्कर्म करण्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. अध्यक्षांवर आरोप करणारी तरूणी एका कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करत आहे. या कंपनीच्या पेमेंट संबंधी चर्चा करण्यासाठी ही तरूणी हॉटेलमध्ये गेली होती, त्यावेळी तिवारीने तिच्यासोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडित तरूणीनं केला आहे.
या तरूणीच्या तक्रारीनंतर नवी दिल्लीमधील संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी दिल्ली जिल्हा पोलीस डीसीपी यांनी देखील ही तक्रार दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 7 मार्च रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एफआयआरनुसार हरयाणामधील गुरूग्राम येथे राहणाऱ्या 30 वर्षांच्या महिलेनं ही तक्रार दाखल केली आहे. ही महिला एका स्पोर्ट्स कंपनीमध्ये डायरेक्टरच्या पदावर आहे.
पीडित तरूणीच्या तक्रारीनुसार मार्च 2021 मध्ये बिहार क्रिकेट असोसिएशननं T20 लीग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या जाहिरातीचे काम या तरूणीच्या कंपनीनं केलं होतं. काम झाल्यानंतरही त्याचे पैसे बिहार क्रिकेट असोसिएशननं दिले नाहीत. त्यानंतर एका परिचित व्यक्तीच्या सांगण्यानुसार ही महिला 12 जुलै 2021 रोजी बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश कुमार तिवारीला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली होती. त्या हॉटेलमध्ये दोघांमध्ये पेमेंटसाठी चर्चा झाली.
या चर्चेच्या दरम्यान तिवारीनं तरूणीचा फायदा उठवण्याच्या उद्देशानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरूणीनं याचा विरोध केला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यानंतर तिने मोठ्या प्रयत्नानं तिवारीला धक्का देऊन तिथून पळ काढला. त्यानंतर बदनामीच्या भीतीनं तिनं या प्रकरणाची सुरूवातीला वाच्यता केली नव्हती. पण अखेर 6 महिन्यानंतर तिनं या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत