समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी स्त्रीशक्तीला व तिच्या कर्तुत्वाला वाव देणे काळाची गरज
समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी स्त्रीशक्तीला व तिच्या कर्तुत्वाला वाव देणे काळाची गरज
जिल्हा परिषद सदस्य सौ. रचनाताई गहाणे यांचे प्रतिपादन
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष रोकडे, गोंदिया : समाजाच्या व देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्त्रीशक्तीला व तिच्या कर्तुत्वाला वाव देणे ही काळाची गरज बनली असून प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे स्त्री शक्ती समाज उन्नतीसाठी महत्वाची आहे समाजामध्ये अनेक स्त्रियांनी आपल्या यशस्वी कार्यकुशलतेने मोठमोठी पदे भूषविली आहेत समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये स्त्रीची मोलाची भूमिका आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सौ रचना ताई गहाणे यांनी केले त्या शिरेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या यावेळी अर्जुनी मोर पंचायत समिती गटविकास अधिकारी विलास निमजे प्रशासक बंडगर साहेब ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व गावातील पुरुष व महिला मंडळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत