Breaking News

महिला सक्षम तर देश भक्कम-नंदा राऊत

महिला सक्षम तर देश भक्कम-नंदा राऊत 

महिलादिनी कोरोना योध्याचा सत्कार..


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष रोकडे गोंदिया : पुरुषांबरोबर स्त्रिया सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.कुटुंबाचा गाडा हाकन्या पासून नवी पिढी घडवण्याचे आव्हान प्रत्येक स्त्री समोर आहे.महिलांनी शिक्षण, आरोग्य ,समाजकारण, राजकारण,अर्थकारण आणि विज्ञानवाद ही क्षेत्रे काबीज केली.महिलांनी वाचन आणि लेखनाचा छंद जोपासावा.भविष्याचा वेध घ्यावा.स्त्री क्षणकाळाची पत्नी तर अनंत काळाची माता आहे.
राष्ट्र उभारणीत महिलांचा मोठा वाटा आहे.महिला सक्षम झाली तर देश भक्कम होईल असे प्रतिपादन कुणबी युवा संघ गोंदियाच्या नंदा राऊत यांनी केले.

  त्या तालुकास्तरिय कुणबी समाज संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करीत होते.स्थानिक प्रसन्न सभागृहात (11) आयोजीत या कार्यक्रमाचे उद्घघाटन मंजुश्या चंद्रिकापुरे यांनी केले.यावेळी नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, उपाध्यक्षा ललिता टेभरे,बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका किरणापुरे, प्रतिभा फुंडे,शारदा फुंडे,स्मिता कुथे,जोत्सना कोरे,नमिता मेंढे,प्रभा बुद्धे,डॉ.सुनीता कापगते,डॉ.सुधा रहिले, कविता गजापुरे,ऍड.प्रांजली भांडारकर उपस्थित होते.

        यावेळी मंजुषा चंद्रिकापुरे यांनी ,ज्या स्त्रीपासून संसाराची उत्पत्ती झाली ती स्त्री आज सुरक्षित नाही.समाजासाठी ही खेदाची बाब आहे.लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या क्रुरतेमुळे स्त्रियांच्या मनात भीतीचे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.मुलीचा जन्म झाल्यास तिरस्कार केला जातो.जी स्त्री भूतलावावरील सर्व नात्यांचे रोल यशस्वीपणे अदा करते त्या महाशक्तीचा पदोपदी अपमान केला जातो. हे आता थांबण्याची गरज आहे. स्त्री-पुरुष समानता हा सूत्र आचरणात आणायला हवा, 

महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक व्हावे.यामुळे स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल.महिलांनी स्वतः मध्ये बदल करणे आवश्यक आहे.त्यांना पुढची पिढी घडवायची आहे.महिला अखंड प्रेमाचे आणि प्रेरणेचे स्त्रोत आहे.स्वतः खंबीर राहून येणार्‍या संकटाचा सामना करण्याची ताकद महिलांमध्ये असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात माँता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमपूजन आणि माल्यार्पनाणे झाली. महिलांसाठी यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.कोरोना काळात विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन कोरोना म्हणून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संघटनेच्या महिलांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत