Breaking News

बिलोली तालुक्यातील गंजगावचे भूमिपुत्र आदर्श मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सहपत्नीक सन्मानित

बिलोली तालुक्यातील गंजगावचे भूमिपुत्र आदर्श मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सहपत्नीक सन्मानित

राज्याचे राज्यमंत्री यांच्यासह माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विशेष उपस्थित  


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी गौतम गावंडे, बिलोली : महाराष्ट्र शासनानी काल परवाच अख्या राज्यात शिक्षण क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकाला शासनाच्या वतीने नुकतेच सन्मानित करण्यात आल्याचे वास्तव चित्र राज्यासह जिल्हा जिल्ह्यात व तालुक्या तालुक्यात पाहवयास मिळाले असून नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील रहिवासी असलेले व लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद कन्या शाळेचे व भादा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश बंसवतराव अनंतवार यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या सह माजी आमदार विद्यमान संभाजी पाटील निलंगेकर यांच्या यांच्या विशेष उपस्थित लातूर येथे नुकताच आदर्श गुरुगौरव पुरस्कार देऊन सहपत्नीक सन्मानित करण्यात आले असल्यामुळे मुख्याध्यापक अनंतवार यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हा सह बिलोली तालुक्यातुन विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व राजकीय व सामाजिक क्षेञातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे  

       बिलोली तालुक्याचे व गंजगाव येथील रहिवासी रमेश अनंतवार यांनी ग्रामीण भागात मुख्यालयी राहून इंग्रजी विषयाचा विद्यार्थ्यांना जास्तीचे क्लास व मुलांचा संध्याकाळचा अभ्यास पूर्ण करून घेऊन क्लास घेतल्यामुळे सदरील शाळेचा शासनाच्या नियमानुसार १०० टक्के निकालाचे घवघवीत यश प्राप्त करून घेतले भादा पॅटर्न तयार करून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात ही त्यांचे उल्लेखनीय कार्य असल्यामुळे विद्यार्थीना शिस्तप्रिय, मनमिळावू स्वभावाचे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्य करीत असलेल्या व कोरोना महामारीच्या कार्यकाळात एकंदरीत दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रमेश अनंतवार यांनी बाला उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमातून शिक्षण देण्याचे काम चालू ठेवले असताना ही त्यापेक्षा ही शाळेतील मुला मुलींना तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय, राज्यस्तरा पर्यंत विविध स्पर्धेत ऑनलाइन ऑफलाइनच्या माध्यमातून उंचाक मिळावीला असून त्यांच्या डोळस विचाराच्या संकल्पनेतुन एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम कोरोना महामारीच्या काळात रबविले आहे आदर्श मुख्याध्यापक अनंतवार यांना गुरु गौरव पुरस्कार मिळाल्या बदल गंजगाव ग्रामपंचायते माजी सरपंच प्रतिनिधी वैभव घाटे यांच्या सह दैनिक प्रजावाणीचे तथा बिलोली टाईम्स न्युजचे पञकार माधव पवार, साहेबराव दावलेकर, शंकर पवारे, गौतम गांवडे यांच्या वतीने अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत