पहिले केला तिने वडिलांना अखेरचा फोन मग थेट पुलावरून नदीत घेतली उडी
पहिले केला तिने वडिलांना अखेरचा फोन मग थेट पुलावरून नदीत घेतली उडी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी याठिकाणी मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका विवाहित महिलेनं आपल्या वडिलांना अखेरचा फोन करून थेट पुलावरून नदीत उडी मारली आहे. पण सुदैवानं नदीत पोहणारी काही मुलं वेळीच मदतीला धावले. संबंधित तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पाण्यातून बाहेर काठल्यानं तिचा जीव वाचला आहे. यानंतर पोलिसांच्या मदतीनं त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. संबंधित घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचं लग्न 2012 साली झालं असून ती आपल्या पतीसोबत करवीर तालुक्याती आंबेवाडी याठिकाणी वास्तव्याला आहे. त्यांना नऊ वर्षांचा मुलगा देखील आहे. कौटुंबीक वादातून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत होती. घटनेच्या दिवशी शुक्रवारी देखील या दाम्पत्यात वाद झाला होता. या वादानंतर महिलेचा पती तिच्यावर रागावला होता. त्यानंतर तो तसाच आपल्या कामावर निघून गेला.
पती कामावर निघून गेल्यानंतर संबंधित महिला सकाळी अकराच्या सुमारास घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती थेट पंचगंगा नदीजवळ आली. तिने रागाच्या भरात वडिलांना फोन केला. 'मी पंचगंगा नदीत जीव देत आहे. माझ्या मुलाचा सांभाळ करा' असं वडिलांना फोनवरून सांगितलं. त्यानंतर पुढच्याच क्षणात महिलेनं पुलावरून थेट नदीत उडी मारली. दरम्यान नदीत पोहणाऱ्या काही मुलांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत. महिलेला पाण्यातून बाहेर काढलं आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी देखील तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेचं समुपदेशन केलं. तसेच सीपीआरमध्ये दाखल होण्याची विनंती केली. पण त्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी इच्छुक नव्हत्या. पण पोलिसांनी तिची समजूत काढल्यानंतर अखेर त्या रुग्णालयात दाखल होण्यास तयार झाल्या. पोलिसांनी या घटनेची माहिती पीडित महिलेच्या कुटुंबीयांना दिली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी पीडित विवाहितेच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचं देखील समुपदेशन केलं आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत