सावंगी,बेला,सिर्सी मार्गावर दिसलेला वाघ सापडला मृतअवस्थेत
सावंगी,बेला,सिर्सी मार्गावर दिसलेला वाघ सापडला मृतअवस्थेत
महा घडामोडी न्युज नेटवर्क, उमरेड : मकरधोकडा मार्गालगतच्या झुडपात मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा मृत्यू विद्युत करंटे लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अध्यालात स्पष्ट झाले आहे. या अहवालाच्या अनुषंगाने वन विभागाने चौकशी केली असता, यामध्ये वीटभट्टी कामगारांनीच थेट विद्युत खांबावरून जिवंत तार लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तीन कामगारांना अटक करण्यात आली आहे. ही वीटभट्टी माजी नगरसेवक राजेश भेंडे आणि मीनल झाडे यांच्या मालकीची असून, या संपूर्ण घटनाक्रमामुळे खळबळ उडाली आहे.
रानडुकराच्या शिकारीसाठी ही विद्युत तार लावण्यात आली होती. यामध्ये वाघ अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. भय्यालाल जंगलू दरशिम्हा (30), मनकलाल प्रेमनाथ दरसिम्हा (२६) आणि दिलीप सुबन शिन् (२७) (सर्व रा. रामपूर (भाटा), ता. जुन्नार, जि. छिदवाड़ा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिन्ही आरोपी वीटभट्टीवर कामाला होते. सोमवारी तिघांनाही प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात वनकोठडी प्रकरण दाखल करण्यासाठी हजर करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी दिली.
या आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. नागपूर (प्रा.) मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार उत्तर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. के. मड़ावी, लहू ठोकळ, मंगेश कोरे, आकाश जेंगळे, के, पी. लांबधरे, गोपीचंद सहारे, नीलेश टवले, विनोद शेंडे, गणेश जाधव आदींनी ही कामगिरी पार पाडली. या प्रकरणात अजून काहीजणांचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत असून, पुढील तपास एन. जी. चांदेवार करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत