Breaking News

सावरगाव जि.प. प्र.शाळेस दहा हजार रुपयांची पुस्तके भेट

सावरगाव जि.प.प्र.शाळेस दहा हजार रुपयांची पुस्तके भेट 
 

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी शेख चांदपाशा,नांदेड : महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे जिल्हा परिषदेच्या प्रशालेत देण्यात येणारी दहा हजार रुपयाची पुस्तके यावर्षी तालुक्यातील जि.प. प्रशाला सावरगाव पि. येथे देण्यात आली आहेत. जिल्हा परिषद प्र. शालेचे उपक्रमशील व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गोविंदराव चव्हाण यांच्या कल्पक व नाविन्यपूर्ण कामाची दखल घेऊन या वर्षीच्या दहा हजार रुपयांच्या पुस्तकासाठी प्रस्तुत शाळेची निवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी मिशन नांदेडचे अध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम व महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता लाठकर यांच्या पुढाकाराने व महात्मा गांधी मिशन ग्रंथपालन शास्त्र विभागाचे प्राचार्य डॉक्टर गोविंदराव हंबर्डे यांच्या कल्पकतेतून दरवर्षी जिल्हा परिषदेच्या एका शाळेस दहा हजार रुपयांची पुस्तके भेट दिली जातात. पुस्तक स्विकारताना मुख्याध्यापक जि.सी.चव्हाण, प्रसिद्ध साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर, कवी एकनाथ डुमणे उपस्थित होते. शाळा व शिक्षणप्रेमी तसेच वाचनप्रेमी व गावातील नागरिकांनी एमजीएम कॉलेज चे आभार मानून शाळेची पुस्तके मिळाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत