Breaking News

पत्रकारांवर हल्ला कराल तर कोठडी अटळ..

पत्रकारांवर हल्ला कराल तर कोठडी अटळ..


महा घड़ामोदी न्यूज तालुका प्रतिनिधि,बालाजी सुवर्णाकार, उदगीर :- पत्रकारांची एकजूट, योग्य दबाव आणि पाठपुरावा झाला तर पत्रकार संरक्षण कायदा पुरेसा सक्षम आहे.. हे मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष, सांगलीचे पत्रकार शिवराज काटकर यांनी दाखवून दिले आहे.. जत येथील पत्रकार एन. बी. गडदे यांच्यावर हल्ला करणारयांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करावा यासाठी जतच्या पत्रकारांनी आग्रह धरला, त्याचा पाठपुरावा करून त्यात यश मिळविले.. कायदा अजामीनपात्र असल्याने आरोपींना अटक झाली.. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.. म्हणजे पत्रकारांवर हल्ला करणारयांची होळी पोलीस कोठडीत साजरी होत आहे..

कायदा सक्षम आहे, जेथे पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करतात, पळवाटा शोधतात तेथे आपले स्थानिक पदाधिकारी, पत्रकार कमी पडतात असे म्हणावे लागेल.. कायदा तकलादू आहे असे म्हणून आपण हल्लेखोरांच्या हाती कोलित देत असतो हे टाळता आले पाहिजे..

जतच्या बातमीला सोशल मिडिया आणि वृत्तपत्रातून जास्तीत जास्त प्रसिध्दी मिळायला हवी जेणे करून हल्लेखोरांच्या मनात कायद्याचं भय तयार होईल आणि पत्रकारांवर हल्ले करण्यापुर्वी ते हजारदा विचार करतील..

सांगली जिल्ह्य़ात एका महिन्यात दोन पत्रकारांवर हल्ले झाले.. परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली.. यश मिळेपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला. . शिवराज काटकर, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सांगली जिल्ह्य़ातील तमाम पत्रकारांचे उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद उदगीर तर्फे अभिनंदन..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत