Breaking News

पांदण रस्ता मोकळा करून रस्त्याची निर्मिती करा- इंसाफची मागणी

पांदण रस्ता मोकळा करून रस्त्याची निर्मिती करा- इंसाफची मागणी


महा घड़ामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधि,शेख चांदपाशा,नांदेड़ : तालुक्याच्या नंतर सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुक्रमाबाद शहराचा उल्लेख होतो मात्र शहरात अतिक्रमण होत असल्यामुळे कुठेतरी विकास खुंटल्याचे निर्दशनास येते. पानंद रस्ते अतिक्रमण झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुक्रमाबाद शहराचा विस्तार झपाट्याने होत असून शहर तालुकास्तरावर चे शहर बनले आहे. माञ अंतर्गत रस्ते होत नाहीत. 

शहरातील प्रवास जलद होण्यासाठी येथील सुजान बाई भोसले प्राथमिक शाळेपासून वट्टमवार यांच्या शेतालगत ते चमन व आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशनच्या पाठीमागून शेरी तांड्याच्या रस्त्यापर्यंत असलेला रस्ता हा अतिक्रमण झाला असून या ठिकाणचे अतिक्रमण हटवून रस्त्यांची निर्मिती करून देण्यासाठी मुक्रमाबाद येथील आॕल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ या सामाजिक संघटनेच्या वतिने पांदण रस्त्यावर झालेले अतिक्रमण लवकरात लवकर हटवून त्या ठिकाणी भव्य असा रस्ता बनवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

 हा रस्ता झाल्यास शहरातील मधोमध असल्यामुळे गावाच्या वैभवात भर टाकणार आहे .तसेच नवीन वाढवस्तिचा भर पडल्यामुळे गावातील रहदारीस मोठी अडचण होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून रस्ता झाल्यास आडत लाईन ,दर्गा परिसर व तीर्थक्षेत्र दर्जा मिळालेल्या हेमाडपंती महादेव मंदिर ला जाण्यासाठी एक सोयीचा मार्ग निर्माण होईल येथील अंतर्गत रस्ते होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सारखे प्रकार वाढले आहेत. यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करून नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी व शहराच्या विकासासाठी हा रस्ता होणे गरजेचे असल्यामुळे निवेदन देण्यात आले .

 यावेळी ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ जिल्हा समन्वयक जलील पठाण, जेष्ठ पञकार तथा माहीती अधिकार तपास समितीचे अशोक लोणीकर, सरपंच प्रतिनिधी बालाजी बोधने,उपसरपंच सदाशिव बोयवार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शफी कुरेशी, अन्याय अत्याचार समितीचे सैलानी शेख ,अजीम तांबोळी,गौस पठाण, अवेश पठाण, शरीफ बागवान, शेख, यांच्या सह अनेक पदाधिकार्‍यांच्या वतीने सरपंच ,ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांना हे निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत