Breaking News

आई वडिलांची सेवा करणे की काळाची गरज.ह. भ. प. आनंदराव माळोदे

आई वडिलांची सेवा करणे की काळाची गरज.ह. भ. प. आनंदराव माळोदे 



 महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधि, सुवर्णकार बालाजी,उदगीर : सध्याचे युग हे संगणकाचे युग असून या युगात वाचन लेखन कमी झाल्यामुळे भक्तीचा मार्ग कमी झाल्यामुळे , उच्च पदावर गेलेले मोठेअधिकारी हे आई-वडिलांना विसरत चालले असून , सध्याच्या या युगात आई-वडिलांची सेवा करणे ही काळाची गरज असून मुलांना चांगले संस्कार देणे ही काळाची गरज असल्याचे मत ह.भ.प. आनंदराव मालोदे महाराज यांनी व्यक्त केले . ते सुवर्णकार परिवाराच्या वतीने तोंडार येथे आयोजित केलेल्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त ते आपल्या कीर्तनात बोलत होते . ते पुढे म्हणाले की स्वार्था बरोबर परमार्थ करणे हे देखील गरज असल्याचे त्यांनी सांगितले  . सद्याच्या या संगणकाच्या व मोबाईल च्या युगात तरुण पिढी बिघडत चालले असून या तरुण पिढीला चांगले संस्कार देवून त्यांना भक्ती मार्गात आणण्याचे सांगितले. या प्रसंगी तोंडार गावातील लहानथोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुकाराम बीज यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सुवर्णकार परिवारातील सर्वच लहान-थोर मंडळींनी पुढाकार घेतला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत