वीज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे ऊर्जाभवन गेट समोर विघुत कायद्या -२०२१ व खाजगीकरणच्या विरोधात चौथ्यांदा निदर्शने/व्दारसभा
वीज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे ऊर्जाभवन गेट समोर विघुत कायद्या -२०२१ व खाजगीकरणच्या विरोधात चौथ्यांदा निदर्शने/व्दारसभा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभिंयते व अधिकारी राज्यस्तरीय संघर्ष समितीच्या वतिने संपूर्ण महाराष्ट्रभर द्वारसभा घेण्यात आली त्याच धर्तीवर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या विज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सी टी पी एस चंद्रपूर द्वारा सुधारित विघुत कायद्या-२०२१ ला विरोध,जल विद्युत केंद्र हस्तांतरण थांबविणे, देशात विज क्षेत्रांत होणारे खाजगीकरण थांबविणे, व्यवस्थापनाचे एकतर्फी धोरण विरोध व आजची व्यवस्थापनाची बैठक पुढे ढकलली इत्यादी मागण्याकरीता तसेच दि.२८ व २९ मार्च २०२२ ला होणाऱ्या दोन दिवसीय संप बाबत जनजागृतीसाठी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जाभवन गेट समोर दुसऱ्यांदा दि. २५\०३\ २०२२ ला व्दारसभा घेण्यात आली.
या व्दारसभेला ग्रॅच्युएट इंजिनियर्स असोसिएशनचे केंद्रीय सचिव नवल दामले, सर्बोडिनेट इंजिनियर्स अशोसिएशनचे संयुक्त सचिव नितीन काळे, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे मडावी,महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे मिलिंद कोटरंगे,राजेंद्र लहाने,महाराष्ट्र राज्य विद्युत अधिकारी कर्मचारी संघटनेचे वर्धेजी व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मान्यवरांने विस्तृत संबोधित करून घोषणाबाजी केली.यावेळी दि.२८ व २९ मार्च २०२२ ला होणाऱ्या दोन दिवसीय संप बाबत सर्व कर्मचाऱ्यात जनजागृती करून संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
या द्वार सभेचे सुञसंचालन महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे यांनी केले तर आभार अभय मस्के यांनी मानले या सभेला चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या संघटना संयुक्त समितीचे विक्की राठोड, अमोल मोंढे, सिद्धेश्वर कस्तुरे,देवराव कोंडेकर ,विजयसिंग राठोड, राजा वेमुला,पांडुरंग बोबडे ,राहुल कीर्तन,प्रकाश वाघमारे,ओम आवारी, दिलीप मोहोड व सर्व सघंटनाचे पदाधिकारी व सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत