राष्ट्रवादी काँग्रेस के गट नेते जफर शेख यांचा सत्ताधारी शिवसेनेला धक्का
राष्ट्रवादीच्या गटनेते यांच्या तक्रारीवरून नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा रद्द;
जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार
महा घडामोडी न्यूज नेटवर्क बोदवड ; बोदवड शहरात नुकतीच नगराध्यक्षाची निवडणूक होऊन काही दिवस उलटली आहे. त्यात विषय समित्यांची निवड झाली त्यात सत्ताधाऱ्यांनी राजकीय शडयंत्र रचल्याने राष्ट्रवादी पक्षाला एकही समितीवर वर्णी लागू दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला त्यावेळी मुकावे लागले.
तसेच नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा 29 मार्च रोजी घेण्याचे ठरविल्याप्रमाणे सर्व नगरपंचायत सदस्यांना सभेच्या 5 दिवस अगोदर अजेंडा दिला. अजेंड्या बरोबर टिप्पणी सादर करावयाची असते परंतु मुख्याधिकारी यांनी विना टिप्पणी सभा बोलावली. नियमानुसार सभेचा अजेंडा 7 दिवस अगोदर सर्व सदस्यांना द्यावयाचा असतो परंतु मुख्याधिकाऱ्यांनी 5 दिवस अगोदर अजेंडा दिला त्यासोबत टिप्पणी न देता सभा बोलावने ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जफर शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून दि. २४ रोजी नगरपंचायतीच्या सभेचा अजेंडा 7 दिवस अगोदर न देता 5 दिवस अगोदर दिल्याने व टिप्पणी न दिल्याने सभा पुढे लोटावी मांगणी केली होती.
राष्ट्रवादीचे गटनेते यांच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. नगरपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांचे जा. क्र. पालिका -3/कवि 595/2022 दि.२५ मार्च ला पत्र प्राप्त होताच मुख्याधिकाऱ्यांनी 29 मार्च रोजी ची सभा पुढे ढकलली. व त्याबाबत जोल्हाधिकाऱ्याना व राष्ट्रवादी चे गटनेते जफर शेख यांनां जा.क्र. बोनप/सा.प्र./386/2021-22 पत्र देऊन नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्याचे कडविले. व दि. 29 रोजी होणारी सर्वसाधारण सभा पुढे लोटली आहे.
अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांशी संगणमत तर नाही; मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नचिन ?
नगरपंचायत ची सर्वसाधारण सभा बोलावली असतांना सभेचा अजेंडा सर्व सदस्यांना नियेजित सभेच्या 7 दिवस अगोदर द्यावयाचा असतो व कामाची टिप्पणी सुद्धा आजेंड्यासोबत द्यावयाची असते. परंतु मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सभेचा अजेंडा नियोजित सभेच्या तारखेपासून 5 दिवस अगोदर दिला व त्यासोबत कामाची टिप्पणी न देता अजेंड्यावर विषय घेऊन विनाटिप्पनी सभा आयोजित केली. ही बाब लक्षात घेता मुख्याधिकारी व सत्ताधाऱ्यांनी संगनमत करून तर अजेंडा देण्यास उशीर केला नाही? सूडबुद्धीचे राजकारनात मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांसोबत सामील तर नाही? मुख्याधिकाऱ्यांनी लोभपोटी सत्ताधाऱ्यांसोबत मिळून तर अजेंडा व टिप्पणी देण्यास उशीर केला नाही? असे अनेक प्रश सदस्यांना व जनतेला उपस्थित झाला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत