साहेब,आमचे ग्रामपंचायत कार्यालय सुरू करा हो! मार्डा ग्रामवासियांचा टाहो!
साहेब,आमचे ग्रामपंचायत कार्यालय सुरू करा हो! मार्डा ग्रामवासियांचा टाहो!
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी खेमचंद नेरकर,वरोरा : तालुक्यातील मार्डा ग्रामपंचायत कार्यालय मागील दोन महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजासाठी गावकऱ्यांना भटकावे लागत असल्याने ग्रामपंचायत कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी एका निवेदनातून संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांना करण्यात आली असून मागणी पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामवासी यांनी दिला आहे.
वरोरा तालुक्यातील मार्डा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलि ने अधिग्रहित केल्या आहेत. त्याचप्रमाणे गावाशेजारील नदीवर बंधारा बांधून तालुक्यातील वर्धा पॉवर आणि जी.एम. आर कंपनीला पाणीपुरवठा केला जातो.गावातील 90 टक्के शेतकरी प्रकल्पग्रस्त असल्याने त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. मागील दोन महिन्यापासून येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे दरवाजेच उघडले गेले नसल्याने गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात सरपंच व ग्रामसेवकाला विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने गावकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. मागील दोन महिन्यापासून ग्रामसभा झालीच नसल्याने हे ग्रामपंचायत कार्यालय नुसती शोभेची वास्तू तर नाही ना? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील दोन महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद अवस्थेत असल्याने ग्रामवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात चपराशी नसल्याने दैनंदिन कामे होत नसून गावातील विजेची व पाण्याची व्यवस्था मोडकळीस आलेली आहे.या संदर्भात सरपंच व ग्रामसेवकाला विचारणा केली असता गावकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.8 डिसेंबर 2021 ला झालेल्या ग्रामसभेनंतर गावात एकही ग्रामसभा झाली नसल्याने ग्रामवासियांमध्ये नाराजी असून यासंदर्भात मागणीचे निवेदन गावकऱ्यांकडून संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालय पूर्ववत सुरू करण्याचीg मागणी करण्यात आली आहे.मागणी पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रस्तुत प्रतिनिधिने याविषयींअधिक माहिती ग्रामसेवकआणि सरपंच यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत