Breaking News

बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज

बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज


अर्जुनी-मोर, संतोष रोकडे ;  दिनांक 4 मार्च पासून दिनांक सात एप्रिल पर्यंत इयत्ता बारावीचे नागपूर विभागीय मंडळ नागपूर यांच्या इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे अर्जुनी-मोर तालुक्यात एकूण आठ परीक्षा केंद्र पद सतरा  परीक्षा उपकेंद्र असे एकूण 25 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेत एकूण 2416 परीक्षार्थी परीक्षेत प्रविष्ट झालेले आहेत प्रत्येक परीक्षा केंद्राला एक याप्रमाणे प्रश्नपत्रिका नेणे व उत्तर पत्रिका आणून देण्यासाठी एकूण पंचवीस सहाय्यक परीरक्षकांची म्हणजेच रनर नेमणूक करण्यात आलेली आहे ही परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अर्जुनी-मोर शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आर एल मांढरे सहाय्यक परिरक्षक जी यु ठाकरे अथक परिश्रम घेत आहेत सर्व परीक्षा त्यांनी परीक्षेत सहभागी व्हावे व तनाव मुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी आर एल मांढरे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत